हो हे पत्र पालकांसाठीच आहे.

09-07-24
mohan patil
569
हो हे पत्र पालकांसाठीच आहे. Image

मुलांच्या भविष्याचे स्वप्न पाहणारा
एक सामान्य पालक 
यांसी,
 
हो हे पत्र पालकांसाठीच आहे..

स.न.वि.वि.

माझ्या सह (मी ही एक पालक आहे) तुम्हाला एक पत्र लिहावेसे वाटले म्हणून हा प्रपंच करत आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे.

आपण शिक्षण घेतले अ, आ, इ पासून ते X Y Z पर्यंत 1,2,3  पासून ते sine, cos  पर्यंत अगदी मनमुराद आपण आपला अभ्यास करायचा पेपर ला जायचे निकालाची फार काय वाट पहिली नाही, कारण अंदाज असायचा किती मार्क आपल्याला पडणार आहे त्यामुळे सगळं कसं सुरळीत होत आणि विशेष करून आपल्या पालकांचा आपल्यावरती दबावही फार न्हवता. यामुळे आपल्यातल्या काही मंडळींनी उच्च शिक्षण घेऊन सामाजिक सेवा करावी असे वाटले त्यांनी प्रयत्न केला यशस्वी झाले आणि ते त्यांच्या सेवेमध्ये रुजू झाली ते झाले त्याचं कारण कोणत्याही प्रकारचा पेपर फुटी सारखा घोटाळा झाला नाही, म्हणून त्यामुळे ते शक्य होऊ शकले. पण आज तसं नाहीये आपल्या मुलांपुढे मोठ्या समस्या आहेत. त्यांची स्वप्न ही स्वप्नच राहतात की काय याची भीती आपल्यासह त्यांनाही प्रकर्षाने जाणवत असेल सामाजिक, कौटुंबिक अपेक्षांच्या ओझ्याखाली ते अधिक दाबल्या गेल्याचे दिसते म्हणून की काय या शिक्षण प्रक्रियेमध्ये सन २०२२ या वर्षामध्ये सुमारे १३००० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. आणि भयंकर आहे.

आपली मुले प्रामाणिक आहेत त्यांना स्वप्न आहेत आणि पूर्ण करण्याची हिम्मत आहे. त्यांना हवी ती आपली साथ आणि ते आपण देतच असतो आणि देत नसेल तर या पत्रानंतर तुम्ही नक्की द्याल. त्याचप्रमाणे या प्रक्रिये मध्ये आपल्या बरोबर शासन व्यवस्था असणे तितकेच गरजेचे आहे. त्यांनी शालेय जीवन आणि परीक्षांमध्ये कोणताही गोंधळ न होवुदेने ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. 
स्पर्धा तर होणारच पण ती निकोप आणि प्रसन्न वातावरणामध्ये झाली पाहिजे. आपल्यापैकी बऱ्याच पालकांची मुले NEET UG, JEE, MPSC,  UPSC व अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील, केली असेल किंवा भविष्यात करणारे ही असेल पण मला भीती वाटते की ही परीक्षा प्रामाणिकपणे पारदर्शकपणे होतील का ? आणि हा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि गांभीर्याने घेण्यासारखा आहे. 

आपल्या मुलांना आपल्यासारख्या एका कोशात राहून जीवन जगावे असे तरी मला वाटत नाही आणि बऱ्याच पालकांना असे वाटते की नाही. त्यांनी उंच भरारी घ्यावी असेच वाटते पण यामध्ये एक अडसर निर्माण होते आणि ती म्हणजे मागील काही वर्षांमध्ये पेपर फुट घोटाळा या घोटाळ्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान आणि स्वप्नांचा चुराडा. आणि हे आपण शांतपणे पाहत बसलो आहोत का ? आपल्याला असं वाटतंय का की मी बोलून काय होणार आहे ? मी काय करू शकतो ? मी कोणाला समजावून सांगू ? मी काय करू ? माझे बोलून किंवा विचार करून काय होणार आहे ? आणि मग या विचारांमध्ये मी हा विषय पूर्णपणे बाजूला करतो आणि मी माझ्या रोजच्या कामाला पुढे सरसावतो पण असे सोडून देणे जमणार नाही. जाब विचारावा लागेल मुलांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे लागेल ही जबाबदारी घ्यावीच लागेल. म्हणजे परीक्षा पारदर्शक होईल मुलांची स्वप्न पूर्ण होतील आणि पालकांचेही हेच मत असेल की हो मुले मोठी झाली त्यांच्या पायावर उभे राहिले त्यांची स्वप्न पूर्ण झाली.

यासाठी तरी आपण शिक्षण क्षेत्रामध्ये अशा घोटाळ्यांविषयी आवाज नक्की उठवला पाहिजे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला लढावे लागेल. आपल्याला बरोबरीने या विषयावरती आवाज हा द्यावाच लागेल आज माझ्यासारखा एक सामान्य पालक आवाज उठवत आहे असे असंख्य लोक असंख्य संघटना असंख्य पक्ष याविषयी आवाज उठवत आहेत, तर तुम्ही त्यांनाही सहकार्य करणं तितकीच मोठी जबाबदारी आहे. याची जाणीव आम्हा सर्वांना हवी आणि ती ठेवलीच पाहिजे.

सन २०२३-२४ या वर्षांमध्ये NEET UG परीक्षा घोटाळा झाला या प्रकरणाची विविध स्तरीय चौकशी सुरू आहे. ती पारदर्शक व्हावी ज्यांनी - ज्यांनी हा गुन्हा केला आहे, त्यांना कठोर शासन व्हावे. असे माझ्यासारख्या असंख्य पालकांना वाटते म्हणून, आपला आवाज अधिक बुलंद करण्यासाठी, योग्य न्यायासाठी आणि शासन व्यवस्थेला जाग येण्यासाठी, आपण शुक्रवार, दिनांक ०६/०७/२०२४ रोजी १०.३० वाजता, घोटवडे फाटा येथे जमणार आहोत. या आंदोलनामध्ये आपल्याबरोबर आहेत. समस्त मुळशीकर,  मुळशी संघर्ष समिती, प्रोग्रेसिव्ह सिटीजन सोसायटी, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व त्यांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व पालक तरी आपणही नक्की उपस्थित रहा. सदर पत्र एका पालकाचे एका पालकांसाठी आहे. त्यामुळे हे पत्र तुम्हाला ऑनलाईन मिळाल्यानंतर आपल्या भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचवा ही विनंती.
कळावे,
आपला विनीत 


मोहन तात्याबा गोळे पाटील 
अध्यक्ष - प्रोग्रेसिव्ह सिटीजन सोसायटी 
समन्वयक -मुळशी संघर्ष समिती 

(आंदोलनांमध्ये सहभाग घ्यायचा असेल किंवा काही अभिप्राय द्यायचा असेल तर 96 89 53 96 89 या नंबर वर व्हाट्सअप करा.)